धुळेकरांना घरबसल्या आरोग्य सेवा, महानगरपालिकेचा महत्वपूर्ण उपक्रम

Dhule health news | आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आशावर्कर यांना माहिती देऊन सहकार्य करावे,आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
धुळेकरांना घरबसल्या आरोग्य सेवा, महानगरपालिकेचा महत्वपूर्ण उपक्रम
Published on
Updated on

धुळे : महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरीकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळून सक्षम समाज निर्माण व्हावा, यासाठी नागरिकांची प्रत्येक घरस्तरावर भेटी देऊन नोंद घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संबंधित नियुक्त आशा वर्कर यांची बैठक आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत धुळे महानगरपालिका मुख्य सभागृहात घेण्यात आली.

धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची दिनांक ११ मे ते १७ मे या कालावधीत घरस्तरावर भेट देऊन आरोग्याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. यात ३० वर्षावरील नागरीकांची नोंदणी करण्यात येणार आहे. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर इत्यादीबाबत नोंद घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांची तपासणी व आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यात वैद्यकीय तज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. तसेच ज्या नागरीकांना रुग्णालयापर्यंत येणे शक्य नाही.

अशा नागरीकांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. धुळे शहरातील सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे व आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळाव्या यासाठी सदर उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक त्या सूचना तथा आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठकीत संबंधितांना दिले.

तसेच सदर सेवा ही नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने घरस्तरावर नोंदणीसाठी आलेल्या आशा वर्कर यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन द्यावी. व आपल्या कुटुंबाच्या आरोग्य रक्षणासाठी सहकार्य करावे. असे आवाहन धुळे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे. आज झालेल्या बैठकीस अति. आयुक्त श्रीमती करुणा डहाळे, आरोग्य अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी तसेच आशावर्कर व आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news