

धुळे: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या कारणाचे आज धुळ्यात तीव्र पडसाद उमटले. शहरातील शिवतीर्थ चौकात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे. या घटनेचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले. आज शिवतीर्थ चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
यावेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, संदीप पाटोळे, सुधाकर बेंद्रे, निंबा मराठे, राजेंद्र काळे, किशोर वाघ, गोविंद वाघ, नरेंद्र हेमाडे, मनोज ढवळे, संदीप पाटोळे, वामन मोहिते, सुरेश पवार, उल्हास पाटील, प्रफुल्ल माने, उल्हास यादव, श्याम रायगुडे, वीरेंद्र मोरे, जितू जगताप, देवा पवार, नितीन पाटील, दिनेश चव्हाण, भरत वाघारे, गिरीश चव्हाण, संतोष लकडे, भूषण बागुल, विक्रम काळे, सुरेश पवार, मनोज रुईकर, भानुदास चौधरी, सुनील ठाणगे , रवी नागणे, भूषण बागूल उल्हास यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या माध्यमातून करण्याची मागणी झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी हत्येची सुपारी दिल्याचे पढे आल्यामुळे समाजात प्रचंड संताप निर्माण झाला असून या बाबत दोन सुपारी बाज यांना अटक झाली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना अटक करून चौकशी झालीच पाहिजे. तसेच त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. या प्रकरणी मुंडे यांना अटक करावी व तपास सीआयडी मार्फत चौकशी करावा अशी मागणी झाली आहे