

धुळे : पुणे-पिंपरी चिंचवड येथील खान्देश मराठा संघाच्या वतीने सहावा वर्धापन दिवस ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे साजरा करण्यात आला. पुरस्कार वितरण व सांस्कृतिक महोत्सवात धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र ( राम) भदाणे यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या सहा वर्षांपासून पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या खान्देशी बांधवांसाठी कार्यरत असलेल्या खान्देश मराठा पाटील संघाच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खान्देशातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खान्देश मराठा पाटील संघाच्या या उपक्रमामुळे खान्देशी विद्यार्थी, होतकरू उद्योजक आणि नागरिकांना दिशा मिळत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांत संघाने भक्कम आधारस्तंभ उभा केला आहे . त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यातून अनेकांना मदतीचा हात मिळाला असून, खान्देशी संस्कृती, परंपरा आणि बंधुभाव वाढीस लागला आहे.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राहुल कलाटे, पाटील उद्योग समूहाचे चेअरमन उद्योजक दिपक पाटील, माजी नगरसेवक देविदास पाटील, रावसाहेब रवींद्र सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अनिल पवार, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांसह गायक अंजनाताई बर्लेकर, कलाकार अशोक पाटील, अभिनेत्री ऋतुजा उपस्थित होते.