धुळे | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी. असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले.
केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज गुलमोहर विश्रमागृह येथे बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, नोडल अधिकारी एन.आर.पाटील, प्रणय शिंदे, प्रमोद गोतर्ने, हर्षद मराठे आदी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना म्हणाले की, येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यादृष्टीने सर्व पथकांनी सजग होवून काम करावे. आंतरराज्य सीमा ओलांडून अंमली पदार्थ, दारू, शस्त्रे आणि वाटपाच्या वस्तु, रोख रक्कम आदि प्रतिबंधित वस्तूंच्या हालचालींना आळा घालण्यासाठी सर्व चेकपोस्ट, राज्य, आंतरराज्य चेकपोस्ट वर वाहनांची कडक तपासणी करावी. पोलीस विभागाने तसेच भरारी पथकांनी गस्त वाढवावी, संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.