धुळे : जिल्ह्यात ४ हॉस्पिटल, १६ सोनोग्राफी व ८ एमटीपी सेंटरची तपासणी

Dhule hospital inspection : दोन हॉस्पिटल, एका सोनोग्राफी सेंटरला नोटीस
Dhule hospital inspection
हॉस्पिटल
Published on
Updated on

धुळे : गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी, एमटीपी व प्रसूतीगृहांची धडक मोहीमेतंर्गत तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हॉस्पिटल व १ सोनोग्राफी सेंटरला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी बुधवारी (दि.१९) दिली.

गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणे जिल्ह्यात घडू नयेत, यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी, एमटीपी व प्रसूतीगृह यांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची संयुक्तरित्या चार पथके तयार करून धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी १६ सोनोग्राफी सेंटर, ८ एमटीपी सेंटर तसेच ४ हॉस्पीटलची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील शहरी भागातील ४ हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. यावेळी २ हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय पथकामार्फत साक्री येथील ९ सोनोग्राफी सेंटर तर ४ एमटीपीची तपासणी केली. तसेच शिंदखेडा येथील ३ सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली. त्यातील १ सेंटरला नोटीस बजावण्यात आली आहे. तर शिरपुर येथे ४ सोनोग्राफी व ४ एमटीपी सेंटरची धडक मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात आली. या कारवाईनंतर पुढील कालावधीत या प्रकारची कारवाई संपूर्ण जिल्ह्यात तसेच गुजरात व मध्यप्रदेश सीमेलगतच्या सोनोग्राफी सेंटरवर करण्यात येणार आहे.

गर्भलिंग निदान चाचणीबाबत नागरिकांना माहिती मिळाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 18002334475/104 किंवा http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व दिलेली माहिती खरी असल्यास खबरी योजनेतंर्गत माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगांवकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news