धुळे : गुटख्याची तस्करी करण्याचा कट फसला

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Gutkha smuggling driver arrested by Dhule police
गुटखा तस्करी करणाऱ्यां ड्रायव्हरला धुळे पोलिसांकडून अटकFiIle Photo

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि तुपाच्या डब्यांच्या आडोशाने गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत सुमारे 40 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातून महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारा गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना या संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक पवार यांनी या माहितीची खात्री केली असता (एमएच 18 बीए 9903) या क्रमांकाचे वाहनातून महाराष्ट्रात गुटख्या पान मसाल्याचा साठा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक प्रकाश पाटील ,अमरजीत मोरे व अमित माळी तसेच कर्मचारी संदीप पाटील, रवींद्र माळी, संदीप सरग, संतोष हिरे, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, सागर शिर्के, हर्षल चौधरी यांना या गाडीचा शोध घेण्यासाठी पाठवले.

Gutkha smuggling driver arrested by Dhule police
अमरावती : मध्य प्रदेशातून गुटखा तस्करी करण्यास अटक; आसेगाव पूर्णा पोलिसांची कारवाई

या पथकाला मुंबई आग्रा महामार्गावरील पारोळा रोड चौफुली येथून तस्करीचे वाहन आढळून आले. त्यांनी गाडी थांबवून चालकाला माहिती विचारली. त्यानंतर गाडीत असलेल्या मालाची विचारपूस केली असता चालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणून गाडीची तपासणी केली. तपासामध्ये या गाडीमध्ये मशीनरीचे स्पेअर पार्ट आणि तुपाचे डबे भरण्याचे दिसून आले. मात्र हा सर्व साठा बाजूला केला असता त्यातून सुमारे 24 लाख 31 हजार 200 रुपये किंमतीचा विमल पान मसाला आणि 4 लाख 8 हजार 800 रुपये किंमतीची प्रतिबंधित तंबाखू आढळून आले. त्यामुळे पोलीस पथकाने 12 लाख रुपयाच्या वाहनासह 40 लाख 40 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे. चालकाच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news