सोनगीरसह शिंदखेड्यात गॅस टंचाईचा भडका; ओटीपी मिळूनही पुरवठा बंद, संतप्त नागरिकांनी केला चक्काजाम

२००० पर्यंत जादा किमतीत सिलेंडरचा काळाबाजार चालत असल्याचा आरोप
Dhule LPG cylinder news
Dhule LPG cylinder news
Published on
Updated on

सोनगीर : येथे गेल्या ७ दिवसांपासून एच.पी. कंपनीचे सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलेंडर मिळणार या आशेने नागरिकांनी राजकुमार नगर येथे सकाळपासून रांगा लावल्या होत्या. परंतु नरडाणा येथील माणिक गॅस एजन्सीवर हजारो ग्राहकांनी वितरणाचे वाहनच उडवून ठेवल्यामुळे ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरण विस्कळीत झाले.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गोपाल घडामोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ऐन सणासुदीच्या दिवशी गॅसचा तुडवडा का निर्माण झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिंदखेड्यात गॅस टंचाईवरून भगवा चौकात चक्काजाम, प्रशासनाची धावपळ

ऐन अक्षयतृतीयाच्या पूर्व संधेला भगवा चौका संतप्त ग्राहकांचा चक्काजाम शिंदखेडा शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गॅस धारकांचा संयम सुटला आहे. गेल्या आठ ते 10 दिवसांपासून गॅस मिळत नसल्याने आणि गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी शहरातील भगवा चौकात जोरदार चक्काजाम आंदोलन केलं. शहरात माणिक गॅस आणि अरुणाई गॅस या एचपी कंपनीच्या दोन एजन्सी सह भारत गॅसची देखील सेवा आहे. मात्र माणिक गॅस एजन्सीचे कार्यालय गेल्या आठ दिवसांपासून कुलूप बंद आहे.

कार्यालयाबाहेर सिलेंडरसाठी कार्यालयात येऊ नका, बुकिंग नुसार घरपोच सेवा मिळेल असा फलक लावण्यात आला आहे. परंतु अनेक दिवस उलटूनही सिलेंडर घरपोस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पहाटे पाच वाजेपासून नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी 10 च्या सुमारास आंदोलनाचा हत्यार भगवा चौफुलीवर उभारण्यात आला. आंदोलन करत्यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या कारभारावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या मते

नरडाण्याहून शिंदखेडाकडे येणारी गॅसची गाडी सूर नदीत टेमलाय फाट्या दरम्यान थांबवून तसेच हॉटेल व्यावसायिक आणि काही व्हीआयपी ग्राहकांना सिलेंडर वाटले जातात. सामान्य नागरिक भर ऊनात रांगेत उभे असताना हे सिलेंडर परस्पर २००० रुपयापर्यंत जादा दराने विकले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. वर कमाईच्या नादात एजन्सी चालक सामान्य ग्राहकांना वेटीस धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मी आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि पुरवठा अधिकारी नितीन नंदवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला सिलेंडर उद्या मिळेल असं सांगताच नागरिक अधिकच आक्रमक झाले परिस्थितीचा गांभीर्य ओळखून प्रशासनाने नरडाना येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे तोंडी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर नागरिकांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे.

सुमारे एक तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे भगवा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सनासुदीच्या काळात घराघरात पुरणपोळीचा बेत असताना गॅस अभावी चुली पेटवणं कठीण झाल्याने महिला वर्गाचा संताप सर्वाधिक पाहायला मिळाला. आता पुरवठा विभाग या काळाबाजारावर काय कारवाई करते आणि नागरिकांना न्याय मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्याना वेळेवर सिलेंडर न मिळाल्यास मोठे जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनास यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news