

धुळे : महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे तालुक्यात या योजनेचा प्रारंभ नेर येथे आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सध्या राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), रमाई माता घरकुल, शबरी माता घरकुल अशा योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनांतील लाभार्थ्यांना घराचे हप्ते प्राप्त झाले असून, त्यांनी घर बांधणीस सुरुवात केली आहे. त्यांना अधिक बळकटी देण्यासाठी व घर उभारणीत सहाय्य मिळावे, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला.
या योजनेचा तालुकास्तरीय शुभारंभ नेर येथे पार पडला. यावेळी मंडळ अधिकारी समाधान पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, शंकरराव खलाणे, अशोक सुडके, सरपंच गायत्री जयस्वाल, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा विसपुते, तलाठी मयूर सोनवणे, गुलाबराव बोरसे, संजय कपूर, संजय सैंदाणे, वसंत देशमुख, उमेश जयस्वाल, गोटू अमृतसागर, ग्रा. पं. सदस्य डॉ. सतीश बीढरे, दयाराम पारधी, नामदेव माळी, आर. डी. माळी, सुरेश सोनवणे, साहेबराव गवळे, वसंत सोनवणे, वसंत बोरसे, विजय देशमुख, प्रवीण गुरव, पोलिस पाटील, कोतवाल, रोजगार सेवक, निर्मल आखाडे तसेच घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.