Dhule : लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना अटक

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई
Dhule Crime News
लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना अटक
Published on
Updated on

धुळे : लग्नाचे अमिष दाखवून वर पक्षाच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीतील तीन महिला आणि एका युवकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.२) चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या टोळीतील कठीत वधू ही राजस्थान राज्यातील राहणारी असून तिला यापूर्वीच एक अपत्य असताना तिने धुळ्यातील युवकाची फसवणूक केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. या टोळक्याने राज्यभरात असे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

धुळे येथील तुषार रमेश खैरनार या तरूणाने चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून त्यांच्या परिवाराची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. खैरनार यांची आई आणि नातेवाईक त्याच्यासाठी लग्नाचे स्थळ शोधत असतांना त्यांना लग्न लावणाऱ्या एजेंटचा मोबाईल क्रमांक मिळाला. लग्न लावणारा ऐजेंट हा नागपुर येथील रहिवासी आहे. २५ ऑगस्ट रोजी खैरनार यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे एजेंट, लग्न करणारी मुलगी तिच्या सोबत तिची बहीण असे तिघे तक्रारदराच्या घरी आले. मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एजेंट याने लग्न लावण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये लागतील, असे सांगितले. आधीच फिर्यादीचे वय वाढत असल्याने एजेंट व मुलीच्या बहीणीला १ लाख ३० हजार रूपये रोख व ऑनलाईन पध्दतीने दिले. त्यांनतर खैरनार याचे काजल (फिर्यादी सोबत झालेले मुलीचे नाव, वय-२०) या मुलीशी देवपुर येथील आई एकविरा मंदीर येथे लग्न लावून दिले. लग्नाच्या एक ते दोन दिवसात फिर्यादी याला पत्नी काजल हिच्या वागणूकीवरुन संशय आल्याने तिचे आधारकार्ड पडताळणी केली. ती राजस्थान येथील असल्याचे समजले. त्यांनतर काजल हिचे इन्स्टाग्राम आय.डी चेक केले असता तिच्या गळयात मंगळसूत्र व लहान मुलगा असल्याचे दिसून आल्याने अधिक संशय बाळगला. त्यांनतर फिर्यादी याने घरातील लोकांना विश्वासात घेवून याची माहिती दिली. पुन्हा मैत्रींच्या भावाला मुलीचे स्थळ आणा म्हणून एजेंट सचिन मरगडे यास संपर्क केला असता त्याने उज्जैन येथे मुलगी आहे, तिला दाखविण्यास घेवून येतो, असे सांगितले. त्याप्रमाणे पुनम नावाच्या मुलीला दाखवायला घेवून आला. यादरम्यान त्यांनी पोलीसांशी संपर्क साधला असता चाळीसगाव रोड चौफुली येथे एजेंट सचिन मरगडे व फिर्यादी याची तथाकथित पत्नी काजल, काजल हिची बहीण असल्याची सांगणारी नेहा, व उज्जैन येथून आलेली मुलगी पुनम अशांना बोलावून सापळा रचून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news