

धुळे : नीळगव्हाण येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांची नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नीळगव्हाण येथील माजी सरपंच प्रा. मुकेश पाटील यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात 2024-25 मध्ये मौजे नीळगव्हाण येथे अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले. परंतु काही शेतकऱ्यांची नावे नुकसानभरपाई यादीत समाविष्ट नसल्याने त्यांना झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहावं लागेल. म्हणून कोणताही शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहणार नाही म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कैलास देवरे, किशोर मोरे, राकेश मोरे, चेतन मोरे, रणजीत मोरे, अविनाश बोरसे, ज्ञानेश्वर मोरे दिनेश माळीच उपस्थित होते.