धुळे : बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

८ लाखाच्या मुद्देमालासह सहा जणांना अटक
Dhule news
बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केली.
Published on
Updated on

धुळे : बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२४) धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली असून यादरम्यान ७ लाख ९५ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट दारू तयार करणारा सूत्रधार शेख जावीद हा फरार झाला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी गुप्त माहितीदारांच्या मदतीने बनावट दारू तयार करण्याच्या केंद्रांची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यानुसार धुळे शहरात सुमैय्या हॉलचे पाठीमागे जामचा मळा येथे राहणारा शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्टया हा त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या देशी बनावटीची दारु अवैधरित्या तयार करुन तिची गुजरात राज्यात व इतर ठिकाणी निर्यात करीत असतो, अशी गोपनिय बातमी मिळाली. या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोउनि बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी व कैलास महाजन यांनी छापा टाकला.या पथकाने सहा आरोपींना ताब्यात घेवून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुख्य सुत्रधार शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्टया (रा. मोगलाई, साक्रीरोड, धुळे) हा फरार असून पोलिसांनी विशाल विनायक वाघ, तौसिफ शेख निरोददीन शेख, शेख तन्वीर शेख नुरुददीन, शेख तौफिक नुरुद्दीन, शेख इरफान शेख अल्ताफ, गौतम नरेंद्र माळी यांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांच्या ताब्यातून देशी दारुचे ७१ बॉक्स, दारु बाटलीचे बुच पॅक करण्याचे मशिन, दारु मिक्स करण्याचे हॅण्ड मिक्सर मशिन, दारुच्या बाटलीला पॅक करण्यासाठी उपयोगात येणारे १५० बुच (कॅप), यासह एक चारचाकी गाडी असा ७ लाख ९५ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news