Dhule Election News : शिंदखेडा येथे 1.30 पर्यंत 40.30 टक्के मतदान

सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात
धुळे
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी मतदान केले.Pudhari News Network
Published on
Updated on

धुळे : शिरपूर-वरवाडे, पिंपळनेर आणि शिंदखेडा नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज सोमवार (दि.2) रोजी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत शिंदखेडा नगरपंचायतीत सर्वाधिक 40.30 टक्के मतदानाची नोंद झाली.

उमेदवारांची संख्या अशी...

  • शिरपूर-वरवाडे नगरपरिषद: 32 जागांसाठी 84 उमेदवार

  • पिंपळनेर नगरपरिषद: 18 जागांसाठी 68 उमेदवार

  • शिंदखेडा नगरपंचायत: 17 जागांसाठी 55 उमेदवार

मतदान केंद्रे आणि मतदार

  • शिंदखेडा: 17 प्रभाग, 31 मतदान केंद्रे, 22,717 मतदार (11,188 पुरुष, 11,529 महिला)

  • शिरपूर-वरवाडे: 16 प्रभाग, 75 मतदान केंद्रे, 65,789 मतदार

  • पिंपळनेर: 20,310 मतदार

  • मतदानाची आकडेवारी (दुपारी 1.30 वाजेपर्यंत)

  • शिंदखेडा: पुरुष: 4,275 महिला: 4,879 एकूण: 9,154 मतदान: 40.30 टक्के

  • पिंपळनेर: पुरुष: 3,518 महिला: 3,288 अन्य: 1 एकूण: 6,807 मतदान: 33.52 टक्के

  • शिरपूर-वरवाडे: पुरुष: 12,978 महिला: 12,067 अन्य: 4 एकूण: 25,049 मतदान: 38.10 टक्के

मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क

शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत क्रांतिवीर शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालयात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी मतदान केले.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल आणि हिरलबेन पटेल यांनी स्वातंत्र्यसैनिक शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालयात सकाळी 7.30 वाजता पहिल्यांदा मतदान करून प्रक्रिया सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news