Dhule Crime | लैंगिक अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींना 24 तासात अटक

गुन्हा दाखल होणार असल्याची आरोपींना कुणकुण लागल्याने त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करुन पसार झाले
Minor Girl Assault Case
Minor Girl Assault Case Pudhari
Published on
Updated on

धुळे : लैंगिक अत्याचाराचे गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना 24 तासाचे आंत अटक शिंदखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कामगिरी करीत अटक केली आहे. शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील रहिवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

Minor Girl Assault Case
Ulhasnagar Firing Case : कैलास कॉलनीतील गोळीबार प्रकरणी 2 मुख्य आरोपींना अटक

आरोपीच्या साथीदाराने अत्याचार करतांनाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करुन, आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत केला. बदनामीच्या भितीने पिडीत बालिकेने आत्महत्या केली. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शिंदखेडा पोलीस ठाणे येथे बिएनएस कलम 64(1) (i), 351(2), 3(5) सह बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12, 15 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66(ई), 67(ब) वाढीव कलम 107 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Minor Girl Assault Case
Kolhapur Crime | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर चौघांकडून आठ महिने अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा!

हा गुन्हा दाखल होणार असल्याची दोन्ही आरोपींना कुणकुण लागल्याने त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करुन पसार झाले. गुन्हयाची संवेदनशिलता व गांर्भीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी शिंदखेडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले.मात्र आरोपींनी त्यांचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्यांचे लोकेशन काढण्यास मोठी अडचण निर्माण झाली.

Minor Girl Assault Case
Mumbai Crime News : अपघात दाखवून मित्राची हत्या करणाऱ्या चार आरोपींना अटक

प्रयत्न करुनही आरोपींचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीसांनी चिमठाणे गावातील असंख्य नागरीकांकडे संपर्क केला. साक्षीदारांना विचारपूस केली. पारंपारीक तपास करीत असतांना उपनिरीक्षक किशोर जाधव यांच्या पथकाने मुख्य आरोपी संदीप रमेश कंखर (धनगर) यास बडोदा (गुजरात राज्य) येथून तर आरोपी भावेश सुनिल गागरे यास नंदुरबार येथुन अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news