Dhule Crime | कॉपर केबल विक्रीच्या बहाण्याने एकाला लुटणारे गजाआड

निजामपुर पोलीसांची कारवाई
Dhule Crime | Two arrested for robbing on the pretext of selling copper cable
कॉपर केबल विक्रीच्या बहाण्याने लुटणारे दोघे गजाआड Pudhari
Published on
Updated on

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा गाव शिवारात सोहेल उमेदखान पठाण (वय 25) रा.खुंटेपाडा ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर यांचेकडुन सुझलॉन कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 30,000 रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल असे त्यांना काठीने मारहाण करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन लुटले. त्यावरुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी मयुर एस. भामरे, सहा पोलीस निरीक्षक यांनी लागलीच निजामपुर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक प्रदीप पंडीत सोनवणे, पोलीस उप-निरीक्षक मधुकर एल.सोमासे, पोलीस उप-निरीक्षक यशवंत आर.भामरे, पोहेकॉ माळचे, पोहेको नागेश सोनवणे, पोकॉ सागर थाटशिंगारे, पोकॉ प्रवीण दामु पवार, पोकॉ जयवंत राजेंद्र वाघ यांचे पथक बनविले.

गुन्हयातील आरोपी नामे सचिन चक्कर चव्हाण, मगन बच्चन चव्हाण दोन्ही रा.जामदा ता.साक्री जि.धुळे यांना पथकाने गुन्हा घडल्याचा 24 तासाच्या आत अटक केली. तसेच त्यांना तीन दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांचे कडुन मोबाईल व इतर मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करुन त्यांचे इतर साथीदारांचा तपास सुरु आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे,पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षकधुळे, एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी साक्री यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि मयुर भामरे,पोउनि प्रदिप सोनवणे,पोउनि मधुकर सोमासे,पोउनि यशवंत आर.भामरे,पोहेकॉ माळचे, पोहेकॉ नागेश सोनवणे,पोकॉ सागर थाटशिंगारे यांचे पथकाने केली आहे.

नागरीकांना आवाहन

सुझलॉन कंपनीचे नावाखाली स्वस्त दरात कॉपर केबल वायर,सोने चांदी,नाणे, कंपनीत गुतवणुक करुन अवघ्या काही दिवसात पैसे डबल होत असल्या आमिषाला बळी पडु नये बाबत निजामपुर पोलीसांतर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news