Dhule Crime | साक्रीमध्ये अवैध बायोडीझेल आणि केमिकल साठ्यावर मोठी कारवाई

Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्रीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाने धाड टाकून तब्बल पावणे नऊ लाख रुपयांचा अवैध बायोडीझेल आणि केमिकलचा साठा जप्त केला आहे. 'हॉटेल चांदणीवर छापा ३ लाख ७७ हजारांचा माल जप्त करण्यात आला असुन तालुक्यातीलच बोरखीखडी येथील 'हॉटेल चांदणी'वर पुरवठा विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकली.

या ठिकाणी अत्यंत बेकायदेशीरपणे बायोडीझेलचा साठा करून ठेवण्यात आला होता. प्रशासनाने या कारवाईत बायोडीझेल आणि एक वाहन,असा एकूण ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी हॉटेल चालक हुसेनभाई उमरभाई जुनेजा याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी धाड तालुक्यांतीलच भोणगाव येथील 'गौरी पेट्रोल पंपा'च्या पाठीमागील शिवारात टाकण्यात आली.पुरवठा विभागाच्या पथकाला येथे तीन मोठ्या टाक्यांमध्ये रासायनिक साठा लपवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत ५ लाख ८५० रुपये किमतीचे केमिकल जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी धुळे येथे वास्तव्यास असलेले जितेंद्र ठाकूर याच्याविरुद्ध 'जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये' गुन्हा दाखल करण्यात आलाअसुन ही धडक कारवाई पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकारी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, रोहित झोडगे,भारत देसले आणि साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.या धडक कारवाईमुळे साक्री तालुक्यात अवैध इंधन आणि केमिकलची साठवणूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर आता वचक बसेल.

logo
Pudhari News
pudhari.news