Dhule Crime | कारचा टायर फुटल्याने अफूची तस्करी उघड

दहा लाखांचा अफूच्या बोंडांचा चुरा आढळला

Opium Trafficking
कारचा टायर फुटल्याने अफूची तस्करी उघडfile photo
Published on
Updated on

धुळे : कारचा टायर फुटल्याने अफूची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या गाडीमधून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा आढळून आला आहे. या संदर्भात कार वरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावाच्या शिवारात चिमठाणे ते आरावे रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी एमपी 12 सीए 67 78 क्रमांकाची कार आढळून आली. या कारचा टायर फुटून अपघात झाला होता. मात्र अपघात ग्रस्त गाडीला चालक सोडून पळून गेला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही गाडी ताब्यात घेतली. या गाडीची तपासणी केली असता त्यातून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा 204 किलो वजनाचा अफुच्या झाडाचा वाळलेल्या बोंडांचा चुरा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी या अफूच्या साठ्यासह कार देखील जप्त केली. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देवराम ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news