Dhule Crime : मुंबई आग्रा महामार्गावर लुटमारी करणाऱ्या दोघांना अटक

कार, रिक्षा, सात दुचाकीसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका चालकाला गाठून त्याचा मोबाईल आणि रोकड हिसकावून नेणाऱ्या दोन अट्टल चोरांच्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी मुसक्या आवळल्या. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या ६ ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील बनपिंपरी येथे राहणारे विलास दामु पठारे हे मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीच्या पुढे 'साई निवारा' समोर अज्ञात आरोपींनी त्यांना गाठले. आरोपींनी त्यांना धमकावून त्यांच्याकडील एक मोबाईल आणि रोकड असा एकूण १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला आणि पळ काढला. या प्रकरणी त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली.

या गंभीर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करत असतानाच, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना या चोरांबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ 'जनता सोसायटी' येथील एका परिसरात छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी फैजान अहमद मुजम्मील अन्सारी ऊर्फ इन्या आणि शाहीद मुख्तार शेख या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या तिसऱ्या साथीदारासह मिळून महामार्गावरील जबरी चोरीची कबुली दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी यापूर्वी दोंडाईचा, आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या इतर ५ गुन्ह्यांचीही कबुली दिली. या दोघांकडून एक कार, एक रिक्षा, सात मोटरसायकलींसह ९ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news