Dhule Theft | पिकअप गाडी चोरी करणाऱ्या दोघांना शिरपूर पोलिसांकडून अटक

घटनास्थळ परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे पोलिस पथकाने चोरट्यांना पकडले
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील आश्रम शाळांचे धान्य वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी पिकअप गाडी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून हे चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रम शाळेच्या आवारातुन शाळेचे धान्य आणण्यासाठी वापरले जाणारे पिकअप छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच -15/सी के -4882 हे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले म्हणुन शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे बिएनएस क.303(2) नुसार चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Theft
Dombivli Massage Parlour Raid : डोंबिवलीमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलची मोठी कारवाई

या गुन्हयाचा शिरपूर शहर शोध पथक तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना जुने भामपूर येथील संगम सोनवणे (भिल) व अनिल भिल यांनी पिकअप वाहन चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Theft
Two-Wheelers Stolen : शहरातून अर्धाडझन दुचाकी लंपास; विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

या बातमीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक परदेशी यांनी शोध पथकास सुचना व मार्गदर्शन करुन आरोपी व पिकअप वाहनाचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पथकाने घटनास्थळ परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. त्या आधारे जुने भामपूर येथून संगम गंगाराम सोनवणे (भिल) व अनिल खेमराज भिल (भवरे) यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली देवून, विखरण गावाजवळ एका पत्र्याचे शेडजवळ लपविलेली पिकअप वाहन काढुन दिल्याने हे वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news