Dule crime news | खून करून दोंडाईचा नजीक प्रेताची विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघड

Dule crime news
Dule crime news
Published on
Updated on

धुळे : जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे खून करून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नजीक एका पुलाजवळ प्रेत जाळून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात आता धुळे जिल्हा पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गावात राहणारे बैलांचे व्यापारी संजय परशुराम जाधव आणि एका महिलेने विजय भीमा राठोड यांचा खून केला. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते आहे. हा खून झाल्यानंतर आरोपींनी थेट धुळे जिल्ह्यात प्रेत आणले. दोंडाईचा नजीक अंजनविहिरे गावाच्या पाटचारी जवळ एका पुलाच्या पाईपमध्ये प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आज जळगाव जिल्हा पोलिसांच्या पथकाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही माहिती दिल्यामुळे धुळे जिल्ह्याचे फॉरेंसिक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून मयताचे अवशेष शोधण्याचे काम सुरू झाले आहे. परिसरातून मयताची जळालेली हाडे तसेच प्रेताचे अवशेष शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य पुराव्यांचा शोध देखील करणे सुरू झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news