Dhule Crime : धुळे बसस्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगावच्या गुन्हेगारास अटक

Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

धुळे : धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, हा चोरटा मालेगाव येथील रहिवासी असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

शिरपूर येथील रहिवासी शेख अजीज मुजावर हे त्यांच्या आजारी पत्नीसह बसस्थानकात थांबले होते. यावेळी बसस्थानकातील गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने हालचाली करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मालेगाव येथील रेहान खान अफजल खान याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीचे एकूण आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news