Dhule Crime | देशशिरवाडे गावातून एक कोटी रुपयांचा गांजा जप्त, तस्करांचे धाबे दणाणले

स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई
Dhule Crime ganja seized
तब्बल 1 कोटी 19 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून तीन कि.मी.अंतरावरील देशशिरवाडे गाव शिवारातील शेतात छापा टाकत ट्रॅक्टर ट्रॉलीतील तब्बल 1 कोटी 19 लाखांचा गांजा व 6 लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईमुळे गांजा तस्कराचे धाबे दणाणले आहे. पिंपळनेर (ता.साक्री) येथील मोहन देवचंद साबळे यांच्या देशशिरवाडे शिवारातील शेतातून गांजा सदृश्य अंमली पदार्थ कोणत्या तरी वाहनातून विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने संयुक्त्तीरित्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोहन साबळे याच्या शेतात छापा टाकला. तेथे पोपट ओंकार बागुल (वय 40 रा.रायकोट ता.साक्री ह.मु.मोहन साबळे यांचे देशशिरवाडे येथील शेतात) हा मिळुन आला. तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काळे प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने संशय आला. त्यांची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला. चौकशीत बागुल याने हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश्य मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. या कारवाईतएकुण 18 प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला 542.73 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ व 6 लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 कोटी 19 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे व संजय बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सपोनि किरण बर्गे प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि प्रकाश पाटोल, पोहेकॉ संदिप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, पोकॉ अतुल निकम, कमलेश सुर्यवंशी, राजीव गिते व पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोहेकॉ कांतीलाल अहिरे, पोकॉ दिपक पाटील, भरत बागूल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news