Dhule Crime | धुळ्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक

Dhule Latest News: त्यांच्या जवळून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा 12 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला.
Dhule Crime | धुळ्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक
Dhule Crime | धुळ्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक
Published on
Updated on

धुळे : धुळे शहरातील वर्दळीचे ठिकाण म्हणून असणाऱ्या डी मार्ट परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघा युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा बारा किलो गांजा जप्त करण्यात आला असून या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील डी मार्ट परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली. संबंधित दोघे युवक एमएच 18 बीके 0 311 या क्रमांकाची एक्टिवा दुचाकी घेऊन उभे असल्याची खात्री झाल्याने त्यांनी पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले. पथकातील पोउनि अमित माळी आणि पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकुर, अमोल पाटील व सिध्दार्थ निकम यांनी या परिसरात शोध घेतला असता विश्वकर्मा भवना जवळ दोन युवक मोटरसायकल वर एक गोणी घेऊन उभे असल्याचे दिसून आले.

त्यामुळे या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांची नावे निखिल पाटील व चेतन पावरा असल्याचे स्पष्ट झाले त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेत आणून त्यांच्या जवळून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा 12 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला. त्यामुळे दुचाकी सह सुमारे तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

या संदर्भात चाळीसगावरोड पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 8 (क), 20(ब), 2(क), 22(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील गुन्हे वृत्त

Dhule Crime
Dhule CrimePudhari

धुळे शहरातील दसेरा मैदान परिसरात हनुमान मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच जागरूक नागरिकाने डायल 112 क्रमांकाचा वापर करून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना योग्य माहिती दिल्याने अवघ्या काही तासात या चोरट्याला अटक करण्यात यश आले आहे. त्याच्या ताब्यातून देवाचा चांदीचा मुकुट आणि चांदीचे तोडे सह दानपेटी जप्त करण्यात आली आहे.

हनुमान मंदिरात चोरी झाल्याची माहिती डायल 112 क्रमांकावर एका जागरूक नागरिकांनी दिली. या प्रणालीच्या माध्यमातून धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना ही माहिती मिळाली. त्यानुसार त्या परिसरात असलेल्या बीट मार्शलला ही माहिती तातडीने पुरवण्यात आली
पोलिसांचे पथक शोध घेत असताना मोटार सायकलने जाणारे सचिन वाडीले यांनी 'एक तरुण दसेरा मैदानाकडून सहजीवन नगरकडे जाणाऱ्या भुयारी रेल्वे बोगदयाच्या रस्त्याने खांदयावर काहीतरी पेटीसारखे घेवून पळतांना मी पाहिले आहे’, अशी माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांचे पथक त्या भागात पोहोचले असता एक तरुण त्याचे खांदयावर दानपेटी घेवून पळताना दिसला. पोलिसांनी त्यास अटक केली असून समीर शहा रमजान शहा ( रा.शंभर फुटी रोड, धुळे) असे या आरोपीचे नाव आहे. कुलूपबंद दानपेटीसह देवाचा चांदीचा मुकुट व चांदीचे पायातील तोडे असा ऐवज आढळून आला. या चोरट्याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news