

धुळे : मुलीच्या नावाने फेक इंस्टाग्राम आयडी बनवून बदनामी करणाऱ्यास सायबर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकारचा गुन्हा झाल्यास पीडित मुलींनी पुढे येऊन तक्रार द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे
धुळे येथे राहणाऱ्या अनामिका (फिर्यादी मुलीचे बदललेले नाव) नावाच्या मुलीने सायबर पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रार केली होती. अज्ञात इसमाकडुन एम ओ - 25 नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आले असुन त्यावर फिर्यादी मुलीचे परवानगीशिवाय फोटो ठेवून फिर्यादी मुलीच्या मित्र व नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी वाईट पद्धतीने चर्टीग करुन फिर्यादी यांची बदनामी करीत आहे. अशी तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 356(2),बीएनएस सह कलम 66 (क) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल घेवून पोलीस निरीक्षक घुसर यांना कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन एक पथक तयार करण्यात आले. सायबर पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने दिड महिने अथक प्रयत्न करुन तसेच इंस्टाग्राम आयडीचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे व आयपी अड्रेसद्वारे सदर गुन्हेगाराचे मोबाईल नंबर, वापर केलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबरचा शोध घेवून आरोपी नामे आकाश पुंडलिक सुर्यवंशी यास सदर गुन्हयात ताब्यात घेवून कारवाई केली. ही कारवाई पोनि सुरेशकुमार घुसर, पोउनि प्रतिक कोळी, पोहेकॉ राजेंद्र मोरे, चेतन सोनगीरे, तुषार पोतदार, हेमंत बागले, शितल लोहार, मपोकों प्रियंका देवरे यांनी केली.
"गेल्या दिवसामध्ये धुळे जिल्हयात अशा प्रकारचे अनेक प्रकरणे समोर आली असुन अनेक तक्रारीमध्ये गुन्हे नोंद करुन कारवाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या गुन्हयाला प्रतिबंध करण्यासाठी तक्रारदार मुलींनी निडर होवून तक्रार देण्यास समोर यायला हवे. तक्रारदार मुलींचे नाव गोपणीय ठेवण्यात येत असते."
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे