धुळे काँग्रेसकडून महागाई, भ्रष्टाचार अन् सरकारच्या अनागोंदी कारभाराची होळी

सरकारी धोरणांच्या विरुद्ध घोषणाबाजी
holi dhule
Published on
Updated on

धुळे | धुळ्यातील काँग्रेस भवनात भ्रष्टाचार ,महागाई आणि महानगरपालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात होलिका दहन करून रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी सरकार जनतेच्या हिताच्या विरोधात काम करीत असल्याच्या घोषणा देत सरकारच्या कारभाराचा निषेध देखील करण्यात आला.

धुळे शहर काँग्रेस भवन मध्ये होलिका उत्सवानिमित्त विवीध क्षेत्रातील भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडरची किंमत वाढ, बेसुमार महागाई वाढवण्यात आल्याचा निषेध करण्यात आला. महानगरपालिकेच्या कडून लादण्यात आलेल्या बेसुमार टॅक्स, धुळे महापालिकेत सुरू असलेला महा भ्रष्टाचार, तसेच शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मुलांवर लादण्यात आलेल्या अटी, महाराष्ट्रातील उद्योग व राज्यातील उद्योग पळवणाऱ्या सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जातीचे बीज पेरून गटागटामध्ये मारामाऱ्या, वादविवाद घालून समाजाला दिशाभूल करणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून केर कचरा आणि भाजप सरकारच्या विविध निषेधात्मक धोरणांच्या प्रतीकांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी युवराज करनकाळ यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या विविध सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेधात्मक होली उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली. याप्रसंगी रमेश श्रीखंडे, डॉ. एस.टी पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, पप्पू सहानी, सुधीर जाधव, भगवान कालेवार, आलोक रघुवंशी, रवींद्र चौधरी, विलास पाटील, खलील अन्सारी, अयुब खाटीक, हरिभाऊ चौधरी, दिपक गवळे, धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र निकम, दीपक पाटील, कैलास पाटील, कन्हैया अहिरे, अफसाना अन्सारी, प्रकाश शर्मा, बानुबाई शिरसाठ, मारुती कोळवले, भिवसन अहिरे, मुकुंद कोळवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news