Dhule Civil Surgeon | यापुढे सर्व रुग्णालयांच्या अचानक तपासणी; जिल्हा शल्यचिकित्सकांचा सुचक इशारा

Civil Surgeon Dr. Ravindra Sonawane | रुग्णांना दर्जेदार आरोग्य् सेवा उपलब्ध करून द्याव्यात : डॉ. रवींद्र सोनवणे
Dhule district health department
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केलीPudhari
Published on
Updated on

Dhule district health department

धुळे : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांनी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी दिले. यापुढे सर्व रुग्णालयांच्या अचानक तपासणी केली जाईल. त्यामुळे लोकाभिमुख सेवा देण्याचे काम यंत्रणांनी करावे, असे आदेश देतानाच उन्हाची तीव्रता पाहता उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि साक्री, पिंपळनेर, जैताणे, सोनगीर, शिंदखेडा, नरडाणा येथील ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलत होते.

Dhule district health department
Dhule Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिके भुसपाट, शेतकर्‍यांना भरपाई द्या : कुणाल पाटील

जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. सोनवणे यांनी या भेटीदरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषधांचा साठा, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, रुग्णांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. आरोग्य सेवा प्रभावी आणि रुग्णाभिमुख करावी. रुग्णालयात नियमितपणे स्वच्छता ठेवावी. आरोग्य संस्थांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आगामी काळात शासकीय आरोग्य संस्थांची नियमितपणे तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य् यंत्रणांनी कार्यान्वित केलेल्या उष्माघात कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी ग्रामीण रुग्णालय, लामकानी, नरडाणा उपजिल्हा रुग्णालय, साक्री येथील इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news