Dhule Bus Accident | थरारक... ! धावत्या बसची चाके निखळली, चाळीस प्रवासी जखमी

दातर्तीजवळ घडली घटना; गर्भवती महिलाही जखमी
Dhule bus accident
धावत्या बसची चाके निखळून अपघात झाला आहे. (छाया : अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर(जि. धुळे) : साक्री येथील एसटी आगाराच्या साक्री-मालेगाव बसचा काल (दि. 5) दुपारी तीनच्या सुमारास साक्री तालुक्यातील दातर्ती गावानजीक अपघात होऊन यात बसमधील 40 प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले असून अन्य 37 रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Summary
  • दातर्ती गावाच्या अलीकडेच बस अपघातग्रस्त झाली

  • पांझरा नदीच्या पुलाच्या अलीकडेच वळणाजवळ बस जोरात उधळली.

  • बसची मागील दोन्ही चाके निखळून पडली.

  • चाळीस प्रवासी जखमी झाले आहेत.

साक्री आगाराची साक्री-मालेगाव बस (एमएच 40,एन 9075) दुपारी अडीचला आगारातून निघाल्यानंतर तीनच्या सुमारास दातर्ती गावाच्या अलीकडेच अपघातग्रस्त झाली. यातील प्रवाशांच्या सांगण्यानुसार दातर्ती गावाजवळ पांझरा नदीच्या पुलाच्या अलीकडेच वळणाजवळ बस जोरात उधळल्यानंतर मागील दोन्ही चाके निखळली आणि अपघात झाला. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून साक्री ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

यात बसमधील सर्व 40 प्रवासी जखमी झाले असून त्यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ धुळे येथे रवाना करण्यात आले. अन्य जखमी रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांमध्ये धमनार, म्हसदी, ककानी, किरवाडे येथील प्रवाशांचा समावेश आहे. साक्री आगाराचे वाहतूक अधीक्षक कुणाल घडमोडे, वाहतूक निरीक्षक यशोवर्धन नगराळे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत एसटी आगारातर्फे रुग्णांना तत्काळ मदत केली.

एकाच दिवशी तीन अपघात

दरम्यान, एकाच दिवशी साक्री आगाराच्या तीन बस अपघातग्रस्त झाल्या. सकाळी सव्वासातच्या सुमारास साक्री आगारातून सुटणाऱ्या अहवा-धुळे बसला गुजरातमधील सुबीर येथील चेक पोस्टनजीक अपघात झाला, तर सकाळी नऊच्या सुमारास साक्री पुणे बसचा नामपूर गावानजीक अपघात झाला, तर दुपारी तीनच्या सुमारास साक्री-मालेगाव बसचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी साक्री- नाशिक या बसचादेखील अपघात झाला होता. काही वेळा अपघात चालकांच्या चुकांमुळे अथवा अन्य कारणांमुळे होत असले तरी सध्या एसटी बसच्या सुरक्षिततेतील तांत्रिक अडचणींमुळेदेखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत एसटी बसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने तांत्रिक अडचणीमुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बस 'पूर्णपणे तंदुरुस्त'नसताना त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून,या सर्व गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

अपघातातील जखमींची नावे -

अपघातातील जखमी जगदीश ईश्वर सोनवणे(19)रा दातर्ती, गोकुळबाई शाम सोनवणे(25)रा.किरवाडे, सरुबाई गजमल बेडसे(85)रा. ककाणी,भारताबाई धर्मराज नेरे(25)रा.वसमार,शानू सोनवणे(33)रा.किरवाडे, राजेंद्र गुलाब सोनवणे रा. दाभाडी,वंदना मुकुंद ठाकरे रा. खाकुर्डी,नदीम खान रियान खान मालेगाव,निर्मला जगन्नाथ काकुस्ते रा.धमनार, जगन्नाथ नथ काकुस्ते रा. धमणार,पनश्री रामदास बेडसे, गणेश शिवाजी बच्छाव रा. धमनार,वृषाली सुरेश बेडसे रा. ककाणी,पुनम नितीन नेरे(25) रा.वसमार,समर्थ नितीन नेरे (3)रा.वसमार,सुनिता सुनीला सरक (19)रा. वसमार,करिष्मा संजय मोरे रा.वसमार,सिंधुबाई रमेश देवरे,मुराजी अशोक वाघ (31) रा.धमनार,पायल मूराजी वाघ (21)रा.धमनार,गोकुळ बाई शामू सोनवणे (28)रा.किरवाडे,यशोदा शामू सोनवणे(12) रा.किरवाडे, कसूबाई शामू सोनवणे रा.किरवाडे,मनीषा मधुकर जाधव(48) रा.भडगाव,राजश्री निलेश बच्छाव(24)रा.धमनार, सविता कैलास बच्छाव(18) रा.धमनार,खंडू भटू वाघ, म्हसदी,संप्रदा भटू वाघ(18) रा.म्हसदी,भारती संजय खैरनार(47)रा.चिकसे, यामिनी संजय खैरनार(23) रा. चिकसे,अनुसया यशवंत मोहिते(70)रा.ककाणी, पुनम भूषण सोनार(30)रा. साक्री,भूषण दशरथ सोनार (30)रा.साक्री,हर्ष भूषण सोनार वय(7)रा.साक्री,रामा कारंडे(55)रा धमनार,सुभाष निंबा कारंडे(75)रा.म्हसदी, राजेंद्र सहादू मोरे वय(52) रा. धामणार जखमींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news