

धुळे : एसआयआरच्या कामात दुर्लक्ष करणा-या 18 बीएलओ कर्मचा-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बसवण्यात आली आहे. तसेच एसआयआर च्या कामाची टक्केवारी कमी असलेल्या 23 बीएलओ यांना वेतन कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यानंतर देखील एसआयआरच्या कामात कुचराई करणाऱ्या बीएलओ यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सदयस्थितीत महाराष्ट्रात नियोजित मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम पूर्व तयारीचे काम मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर सुरु आहे. त्याअनुषंगाने धुळे शहर विधानसभा मतदार यादीतील मतदारांचे यापूर्वी झालेल्या (सन 2002) विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अंतिम यादीतील मतदारांशी मॅपिंगचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत सुरु आहे. त्यानुसार सदरचेचे काम करण्यासाठी बिएलओ यांना पुरेसा वेळ मिळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वये बिएलओ यांना दि. 25 ते 10 एप्रिल या कालावधीत पुर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आलेले होते. तरी काही बिएलओ यांनी याकामात समाधानकारक काम केले नसल्याचे निदर्शनास आल्याने अशा 18 बिएलओ यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येवून खुलासा सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
नोटीस देण्यात आलेले बिएलओ मधे सुनिल लक्ष्मण शिरसाठ, कानिफनाथ विठ्ठलरव सुर्यवंशी, अनिल शिवाजी सुडके सुरेश भिला पाडवी, शकील अहमद सलीमोहिद्दीन शेख, नंदकिशोर प्रभाकर पाचपुते, प्रविण वसंत शिरसाठ, मोहम्मद इमरान अब्दुल सलाम, धनंजय शंकर सोनार, आमेरा सुलताना निहाल अहमद, शिरीष मधुकर ठाकरे, श्रीमती, अर्चना बाळासाहेब पाटील, गोपाळ दोधू पाटील, शुभम जाधव, मनोजकुमार हिरालाल सुर्यवंशी, रमाकांत पुंडलीक देसले, राजेंद्र गाणपत पाटील सुभम बापु केदार, यांचा समावेश आहे. तसेच एस आय आर कार्यक्रम पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॅपीगच्या कामात 30 टक्के पेक्षा कमी टक्केवारी असल्याने 15 दिवसाचे वेतन कपात करणेबाबत आदेशीत करण्यात आले आहेत.
यात राजेंद्र भूरामल सोनवणे, विलास पंडीत वाडेकर, समिर शेख फारुख शेख, शकील अहमद सलीमोहिद्दीन शेख, पुतलीकर मोहम्मद इस्माइल उस्मतान शेख, आमेरा सुलताना निहाल अहमद, रईसोददीन अलाउददीन खतीब, रमाकांत पुंडलीक देसले, संदिप मधुकर जाधव, हेमंत विजय जाधव, राजेंद्र गणपत पाटील, श्रीमती छाया पोपट कुवर, मिलीद नारायण पिसोळकर, प्रसाद सुनिल चित्ते, पंकज लुका बागूल, अनिल शिवाजी सुडके, श्रीमती मनिषा प्रभाकर पाटोल, शुभम जाधव, प्रभाकर मुरलीधर साबळे, श्रीमती मनिषा ज्ञानदेव बच्छाव, श्रीमती अर्चना बाळासाहेब पाटील, यशवंत खंडू भदाणे, धनंजय शंकर सोनार, या बी एल ओ चा समावेश आहे.
यापुढे देखील एस आय आर च्या महत्वपूर्ण कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईल; असा इशारा मतदार नोंदणी अधिकारी धुळे शहर विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी किशोर कदम व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा अपर तहसिलदार धुळे शहर श्रीमती वैशाली हिंगे यांचेकडून देण्यात आला आहे. तसेच मतदारांनी देखील आपल्या यादी भागाचे बी.एल.ओ. यांना त्यांची सन 2002 च्या मतदार यादीतील विधानसभा क्र., भाग क्र.,अ.क्र. इ. माहीती उपलब्ध करुन देण्यात यावी व मॅपीगची कार्यवाही पूर्ण करुन घेण्यात यावी, अन्यथा संबंधीतांचे नाव मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याकामी बी. एल. ओ. यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने धुळे शहरातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे.