धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हयासह राज्यात पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गाय,बैल, गोर्हा आदी गोवंशीय पशुधनाचे खरेदी विक्रीचे व्यापार, व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत गोवंशीय पशुधन खरेदी-विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी केले आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने लंपी आजार प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गोवंशीय (गाय, बैल, गोर्हा) खरेदी विक्री व्यापार व्यवहार बंद करण्यात आले आहेत. लंपी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पशुपालक व व्यापार्यांचा हिताचा निर्णय आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत गोवंशीय पशुधन खरेदी-विक्रीसाठी धुळे बाजार समितीत आणू नये. तसेच सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरास तत्काळ लंपी आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सभापती बाजीराव पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा