Dhule Crime: धुळ्यात महिलेवरील अत्याचार प्रकरणी तिघांना अटक; आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हिडिओ क्लिपनंतर पोलिसांची तातडीने कारवाई; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
Dhule Crime
Dhule CrimePudhari
Published on: 
Updated on: 

धुळे: धुळे शहरातील आझाद नगर परिसरात महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी या घटनेला वाचा फोडत असताना पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले.

काल रात्री उशिरा या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी केले आहे.

Dhule Crime
Dhule News: पशुखाद्याच्या गोण्यांच्या आडोशाने विदेशी दारूची तस्करी; २० लाखांचा मुद्देमालासह कंटेनर जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

धुळे शहरातील एका महिलेवर तिघांना अत्याचार केल्याची माहिती एका व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. हीच माहिती त्यांनी पोलीस प्रशासनाला देखील कळवली. या नराधमांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असतानाच त्यांनी धुळे शहरातील अवैध धंदे देखील तातडीने बंद करण्याचे सूचना केल्या.

यासाठी धुळे शहरातून मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला. आमदार अग्रवाल यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे धुळे शहरात अफवांचे पीक पसरले.

Dhule Crime
Dhule Farmer Loan Waive | कर्जमुक्ती योजनेत धुळ्यातील ३,२५८ शेतकऱ्यांना ३३.०१ कोटींचा दिलासा

दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या . यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आझाद नगर पोलीस ठाणे गाठून संबंधित महिलेची तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी आझाद नगर पोलीस ठाण्यात तरुणांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला होता. या तरुणांची देखील समजून पोलीस प्रशासनाने काढली.

याबरोबरच तातडीने हालचाली करीत पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा बीएनएस कलम 70,308(2),333,351,353,3(5) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3(2)V प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयात आरोपी साहिल हबीब पिंजारी व त्याच्या सोबतचे त्याचे मित्र बाबु इरफान शाह व समद शेख जब्बार यांना तात्काळ ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने आवश्यक ती सर्व कायदेशीर कार्यवाही केली असून शहरात शांततेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news