ATM theft dhule: मुंबई आग्रा महामार्गा लगत एटीएम मशीन गॅस कटरने कापून 11 लाख 96 हजार लंपास

अशा सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे खळबळ उडाली असून चोरट्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे
ATM theft
ATM theftAI Photo
Published on
Updated on

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा गावात असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कापून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या मशीन मधून 11 लाख 96 हजार रुपये चोरीस गेले असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शिंदखेडा शहरातील पाटण चौफुलीवर असणारे एटीएम मशीन देखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे खळबळ उडाली असून चोरट्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

ATM theft
Dhule ATM Theft | एटीएम फोडण्याचा प्रयत्न सायरनमुळे उधळला; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणे गावात रस्त्याच्या लगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. पहाटेच्या सुमारास या सेंटरमधील मशीन चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे तातडीने ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले .यातून चोरट्यांनी गॅस कटर च्या माध्यमातून एटीएम मशीन चा पैसे ठेवण्यात येणारा भाग कापून त्यातील सुमारे अकरा लाख 96 हजाराची रोकड लांबवल्याची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये चोरट्यांनी त्यांची कार शिरपूरच्या दिशेने पळवल्याचे दिसून येते आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील टोल नाक्यावर या कारचे पुढे तपासले जात आहेत.

दरम्यान शिंदखेडा शहरातील पाटण चौफुली जवळ असणारे बँकेचे एटीएम मशीन देखील तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. या एटीएम सेंटरच्या वरील बाजूस वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीने या चोरट्यांना हटकले. यावेळी चोरट्यांनी त्याला जीवे ठार करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे ही व्यक्ती घरात निघून गेली. मात्र घरातून त्यांनी 112 नंबर वर ही माहिती कळवली. त्यामुळे गस्तीवर असणारी पोलीस जीप सायरन वाजवत घटनास्थळी पोहोचली. परिणामी चोरट्यांनी मशीन घटनास्थळावरून पलायन केले. या दोन्ही घटनांमुळे एकच खळबळ उडाली असून आता पोलिसांसमोर या चोरट्यांना शोधण्याची तसेच त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news