Ram Bhadane | अक्कलपाडा १०० टक्के भरण्यासाठी भूसंपादनाला वेग : आमदार राम भदाणे

हिवाळी अधिवेशनात ४१५ कोटींच्या निधीस मंजुरी नंतर कामास गती
Akkalpada dam project
Akkalpada dam project Pudhari
Published on
Updated on

Akkalpada dam project

धुळे : निम्न पांझरा तथा अक्कलपाडा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनात ४१५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याची अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली.

आमदार भदाणे यांनी सांगितले, अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही १०० टक्के भरण्यास अनेक अडचणी येत होत्या. गेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकल्पाचे भिषण वास्तव मांडले. प्रकल्प १०० टक्के म्हणजेच २.७५ टीएमसी क्षमतेने भरण्यासाठी अंदाजे २७.८९ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी ४१५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित जमिनीचे भूसंपादन येत्या काही महिन्यांत मार्गी लागेल. त्यामुळे पुढील वर्षीपासून प्रकल्प १०० टक्के भरण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

Akkalpada dam project
Dhule Crime : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; ४४ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त, कंटेनरसह चालक जेरबंद

अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने न भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित सिंचनाचा लाभ मिळत नव्हता. भूसंपादनाअभावी २.७५ टीएमसीपैकी कमी साठा होत होता. यामुळे या प्रकल्पाच्या लाभापासून धुळे तालुक्यातील बरेचसे क्षेत्र वंचित होते. आता या प्रक्रियेला गती आली आहे. पुर्ण क्षेत्र संपादीत झाल्यानंतर सिंचनाचे लाभ क्षेत्र वाढणार असल्याचे आमदार भदाणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news