Dhule bribe case : विकास कामांच्या बिलाच्या मोबदल्यात लाच घेताना दोघे अटकेत; धुळे एसीबीची धडाकेबाज कारवाई

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

धुळे : जिल्हा परिषदेच्या विकास कामांचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात एक टक्का लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. शासकीय कामांमधील 'खाबुगिरीचा' आणखी एक प्रकार या कारवाईमुळे समोर आला आहे.

Bribe Case
Jalna Bribe | जमीन मोजणी नकाशासाठी १२ हजारांची लाच; भू-अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चाळीसगाव येथे हे दोघे अधिकारी कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व गाव हाळचे काम घेतले होते, जे तक्रारदाराने पूर्ण केले होते. या कामाचे मूल्यांकन होऊन १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. हे बिल अदा करण्यासाठी यथार्थ निनावे यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या एक टक्क्याप्रमाणे १०,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

Bribe Case
Chandrapur Bribery Case | ५ हजारांची लाच घेताना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला अटक

एसीबीचा सापळा

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केली असता, उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांनी तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ठरल्यानुसार सापळा रचला असता, उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांनी आपल्या कक्षात तक्रारदाराकडून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कुलदीप गमे याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bribe Case
Jalgaon Bribe | बांधकाम कामगाराला मोफत सुरक्षा कीट देण्यासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news