उपमुख्यमंत्री फडणवीस गोंदूर विमानतळावर, मराठा समाजाचे कार्यकर्ते स्थानबद्ध

Dhule News | देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचे होते नियोजन
deputy chief minister devendra fadnvis
उपमुख्यमंत्री फडणवीस गोंदूर विमानतळावर आमगनpudhari photo
Published on
Updated on

धुळे : जिल्ह्यातील सोंडले, ता. शिंदखेडा येथे होणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतंर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भुमिपुजन समारंभ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथील गोंदूर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचे नियोजन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आमदार अमरिशभाई पटेल, आ. जयकुमार रावल, आ.काशीराम पावरा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, माजी खासदार डाॅ. सुभाष भामरे आदींनी स्वागत केले. यानंतर उपमुख्यमंत्री हे कार्यक्रमासाठी वाहनाने सोंडलेकडे रवाना झाले.

deputy chief minister devendra fadnvis
AIMIM | ओवीसींकडून मालेगाव व धुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा

मराठा समाजाचे कार्यकर्ते स्थानबद्ध

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. यात शहर पोलीस ठाण्यात भानुदास बगदे, विनोद जगताप, दीपक रवंदळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काल सायंकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आवाहन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news