पिंपळनेरचे राजीव पाटील यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

राजीव पाटील हे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मानित
पिंपळनेर
तालुका क्षयरोग पर्यवेक्षक राजीव पाटीलपिंपळनेर

पिंपळनेर,जि.धुळे : आरोग्य, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील विशेष कार्यामुळे पिंपळनेर येथील तालुका क्षयरोग पर्यवेक्षक राजीव पाटील यांना यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

क्षयरोग विभागात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, ग्रामिण रुग्णालय पिंपळनेर येथे गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेले राजीव पाटील यांनी साक्री तालुक्यातील अतिदुर्गम भागात क्षयरोग जनजागृती, क्षयरोगाच्या रुग्णास उपचार, क्षयरोग रुग्णासाठी पोषण आहारा वाटप, दुर्गमभागातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य विषयक समस्या यांच्या बाबतीत लिखाण, शाळा आणि महाविद्यालय येथे क्षयरोग विषयी व्याख्यान, आरोग्य विषयक कार्यशाळा, गणपती, यात्रा, नवरात्री महोत्सव इत्यादी ठिकाणी क्षयरोग जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन आदींच्या सहाय्याने हजारो क्षयरुग्णांना क्षय रोगावरील उपचार, माहिती आणि सविस्तर मार्गदर्शन देऊन मुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आता पर्यंत खान्देशरत्न, कोरोना योद्धा, मराठा समाज गौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे म्हणूनच यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राजीव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे योजिले असून पुरस्कार सोहळा दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक येथे देण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून राजीव पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news