गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर जीवावर बेतला; अविवाहित तरुणीचा मृत्यू

या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
Birth Control Pills Risk
Birth Control Pills Risk
Published on
Updated on

सोनगीर : धुळे जिल्ह्यात अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून गर्भपातासाठी घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन एका अविवाहित तरुणीच्या जीवावर बेतलं. संबंधित तरुणी केवळ 18 वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्याने तिला देवपूर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणी दरम्यान डॉक्टरांना ती सुमारे 24 आठवड्यांची गरोदर असल्याचं कळलं तसेच गर्भपातासाठी तिने काही औषधांचे सेवन केल्याची बाबही समोर आली आहे.

अधिक प्रमाणात गर्भपातेच्या गोळा घेतल्यामुळे तिचा रक्तदाब झपाट्याने कमी झाला आणि तिला वारंवार झटके येऊ लागले. तिची प्रकृती गंभीर होत असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने हिरे रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नानंतरही उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news