कलकत्ता रेप-मर्डर केस | आरोपींना मृत्यू दंडाची मागणी, आंदोलनाला पाठींबा - डॉ. शोभा बच्छाव

कलकत्ता येथील घटनेचा खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडून निषेध
कलकत्ता रेप-मर्डर केस
कलकत्ता येथे महिला डॉक्टर संदर्भात झालेल्या दुर्देवी घटनेचा धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. image source - x
Published on
Updated on

धुळे : कलकत्ता येथे महिला डॉक्टर संदर्भात झालेल्या दुर्देवी घटनेचा धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. त्याचप्रमाणे घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. तसेच देशात वेगवेगळ्या डॉक्टर संघटनाच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दर्शवला आहे.

कलकत्ता येथे असलेल्या येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करणारे पत्र धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. या मागणी साठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या. या घटनेचा तपास पुढे सरकतो अहे. तशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांसह मी एक महिला डॉक्टर म्हणून सदरची घटना व तिचा तपास हा सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो) द्यावा अशी मागणी करत आहे. कारण यात रुग्णालयातील काही डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असल्याने अजून काही लोकांची नावे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. कारण आतापर्यंत ३० संशयितांची यादी बनवली गेली आहे. यामुळे स्थानिक पोलिसांवर दबाव येण्याची देखील दाट शक्यता जनतेमधून व्यक्त होत आहे.

या संदर्भात मुंबईत, धुळे जिल्हयातील मेडिकल कॉलेज तसेच डॉक्टरांच्या जवळपास सर्वच संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पाठींबा देत धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news