

धुळे : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात परिचारिकांच्या आद्य दैवत फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर पहलगाम येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना व युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. देगांवकर म्हणाले, “कोरोना काळात परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून दिलेल्या योगदानाप्रमाणे, आजच्या रक्तदान शिबिरातून भारतीय सेनेच्या कार्यास बळ मिळावे हा हेतू आहे.” त्यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
रक्तदान शिबिरात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. विवेक जाधव, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अभय शिनकर, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. गीतांजली सोनवणे, सहाय्यक अधिसेविका वंदना मोरे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके, अमरजीत पवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रीन धुळे टीमच्या प्रेरणास्थान ललित माळी यांच्या सौजन्याने रुग्णालय परिसरात 40 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्त परिचारिकांकडून ललित माळी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघशाम घोलप, अमरजीत पवार, कमलेश परदेशी, सिद्धार्थ शिंदे, ओमकार बनस्वाल, श्रीकांत तांबे, निलेश भामरे, मीनाक्षी परदेशी, राजेंद्र गांगुर्डे, भाऊलाल वाघ, इलियास पठाण, मिलिंद पालवे, डॉ. सिद्धार्थ चव्हाण, डॉ. अमित नागडे, हर्षद शेख आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.