Mahashraman | आचार्य महाश्रमण यांची आज पिंपळनेरात पायी यात्रा

पंचतत्वाची संकल्पना घेऊन व्यसनमुक्तीचा संदेश
Acharya Mahasraman's walking journey to Pimpalner
आचार्य महाश्रमण यांची आज पिंपळनेरात पायी यात्राPudhari Photo

पिंपळनेर, (जि.धुळे) : विश्व कल्याणासाठी धर्म,अहिंसा,अपरिग्रह,सत्य, ब्रह्मचर्य या पंचतत्वाची संकल्पना घेऊन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जैन समाजाचे आचार्य महाश्रमण यांची पायी विहार यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज(दि.1)सायंकाळी 6.20 वाजता पिंपळनेर शहरात दाखल होत आहे. रात्री 9 वाजता नवनिर्मित तेरापंथ भवनाचे उद्घाटन आचार्य महाश्रमण यांच्या हस्ते होईल. आचार्यांच्या स्वागतासाठी जैन संघाने तयारी केली आहे.

आचार्य महाश्रमण हे साक्रीहून पायी पिंपळनेरकडे निघतील. सायंकाळी 6 वाजता शहरात त्यांचे आगमन होईल. सामोडे गावापासून त्यांच्या पायी यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर सामोडे चौफुली, बसस्टँड चौफुली, विश्वनाथ चौक,खोल गल्ली, बाजार पेठ, नाना चौक, आदर्श कॉलनी, सटाणा रोड, हस्ती बँकेकडून नवीन कॉलनी सरळ नवीन तेरापंथ भवन या मार्गे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री भवनाच्या उद्घाटनानंतर अध्यात्मिक व धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे ते मंदाने दहिवेल मार्गे सुरतकडे मार्गस्थ होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news