पानखेडा महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

सांस्कृतिक कुंभमेळ्याला लोटला लाखोंचा जनसागर
pankheda mahotsav
पानखेडा महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन(छाया : अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील पानखेडा येथे आज आदिवासी एकता परिषदेच्या सांस्कृतिक कुंभमेळ्याला लाखोंचा जनसागर लोटला. बैलगाडी व पारंपारिक आदिवासी नृत्य, वाद्यासह पिंपळनेर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन आ. दिलीप बोरसे व सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजक डोंगर बागुल यांनी श्रीफळ वाढवून केले. 32 व्या आदिवासी एकता सांस्कृतिक संमेलनाचा आज दूसरा दिवस होता.

पिंपळनेर शहराच्या साईकृष्णा रिसॉर्टपासून आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये बैलगाडीवरून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा, मिझोराम, दादरा नगर हवेली येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषा व वाद्यासह या रॅलीत आपले नृत्य सादर केले. देश, विदेशातील आदिवासी बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला. रॅली जे.टी.पॉईंट कॉर्नर,सटाणा रोड,बस स्टॉप चौफुली,सामोडा चौफुली, नवापूर रोडमार्गे पानखेडा गाबी महासंमेलनाच्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी एक वाजेला महासंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांनी धरती मातेचे व धान्याची पूजा करून केले. कार्यक्रमास खासदार गोवाल पाडवी, आ.दिलीप बोरसे,आ.काशिनाथ पावरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे,साक्री तालुका सभापती शांताराम कुवर, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक साहित्यिक वाहरू सोनवणे,राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शांतीकर बसावा,संमेलनाचे आयोजक डॉगर बागुल,डॉ. मोहन मोरे,इंजि.भोये, सांस्कृतिक विभाग प्रमुख धर्मेंद्र बोरसे,डॉ.प्रतिभा चौरे(देशमुख),आदिवासी बचाव समितीचे गणेश गावित,प्रेमचंद सोनवणे,तुकाराम बहिरम, मांगीलाल गांगुर्डे,संजय ठाकरे,तसेच डॉ.जितेश चौर, डॉ.योगिता चौरे,डॉ.विशाल बळवी,माजी सरपंच देविदास सोनवणे या मान्यवरांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे,भूषण शेवाळे,शिरसाट यांनी कर्मचाऱ्यांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

‌महासंमेलनात सुमारे साडेतीनशे बुक स्टॉल तसेच आदिवासी कलेतून तयार केलेले विविध साहित्य आयुर्वेदिक जडीबुटीसह प्रबोधन करणारे स्टॉल या ठिकाणी सुरू सुरू होते. महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत. दरम्यान महासंमेलनात भव्यदिव्य व्यासपीठ होते. परंतु व्यासपीठावर कोणालाही बसविण्यात आले नाही. देशभरातील आमदार, खासदार,मंत्री,विविध पदांवर उपस्थित मान्यवर उपस्थित होते पण त्यांनाही स्टेज समोर खालीच बसवले जाते. यावेळी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आदिवासी गिते सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news