धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी
Published on
Updated on

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर लहान भावासह दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संदीप गजु माळी (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर अजय गजु माळी (वय २२ रा. बल्हाणे, ता.साक्री) हा जखमी झाला आहे. या दोघांसह करण अशोक पवार असे तिघे सायंकाळी पाचच्या सुमारास एमएच ४२ पी ७०१४ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. त्यादरम्यान पिंपळनेर-सटाणा रोडवरील शेलबारी घाटाच्या पायथ्याजवळ वळण रस्त्यावर त्यांना समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात संदीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अजय व करण हे गंभीर जखमी झाले. याबाबत गजु सिताराम माळी यांनी पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. सोनवणे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news