पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Published on
Updated on

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातच पुणे येथील चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजक घटना घडली आहे. एसटी बसमधील दोरीच्या मदतीनेच त्याने गळफास घेतला. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुणे येथे रहाणारे हिरामण नाथा देवरे (वय ५७ ) असे मयत एसटी बस चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवरे पुणे येथील शिवाजीनगर बस स्थानकामध्ये कार्यरत होते. काल ते पुणे-धुळे बस घेऊन धुळ्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कंडक्टरसह जेवण केले. त्यानंतर कंडक्टर येथील बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेला. तर चालक देवरे यांनी मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बसमधे थांबले. यानंतर त्यांनी घंटी वाजवण्यासाठी असलेल्या दोरीच्या साह्याने बसमध्येच गळफास घेतला.

बऱ्याच वेळ होऊनही चालक बसमधून बाहेर न आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी बसमध्ये जाऊन पाहिले असता हिरामण देवरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबत एसटी महामंडळाचे अधिकारी व शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

दरम्यान हिरामण देवरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एसटी कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर शहर पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news