Wombori Pipeline Water Theft: मढीच्या पाण्यावर डल्ला! जेसीबीने वांबोरी पाईपलाईन फोडली; पाणीपुरवठा ठप्प

आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावात पाणी पोहोचले; लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Wombori Pipeline Water Theft
Wombori Pipeline Water TheftPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: वांबोरी पाईपचारीच्या पाण्याची प्रतीक्षा तब्बल आठ वर्षांपासून करणाऱ्या मढी गावाला अखेर पाणी मिळण्यास सुरुवात झाली असतानाच करडवाडी शिवारात जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा पाईपलाईन फोडण्यात आल्याने मढी तलावाकडे जाणारा पाणीपुरवठा बंद झाला. या घटनेत लाखो लिटर पाणी वाया गेले असून, काहींनी वीजपंप लावून पाणी विहिरी व शेततळ्यांमध्ये वळविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wombori Pipeline Water Theft
Godavari Water Dispute: गोदावरीच्या पाणीवाटपातील दुजाभावाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत; जलसंपदा विभागाकडून चौकशी

वांबोरी पाईपचारीचे आवर्तन ४ नोव्हेंबर रोजी पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आले होते. तब्बल ५९ किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी पाथर्डी तालुक्यातील योजनेतील शेवटचे गाव असलेल्या मढीपर्यंत पोहोचले. १४ नोव्हेंबर रोजी मढी तलावात पाणी दाखल झाले. मात्र, कमी दाबाने आणि तुटक स्वरूपात पाणी येत असल्याने १८ नोव्हेंबरपर्यंत केवळ १७ तास पाणी तलावात पोहोचले. दरम्यान, १६ नोव्हेंबरच्या रात्री कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी पाहणी केली असता मढी तलावात पाणी सुरू नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच १८ नोव्हेंबर रोजी सकाळी करडवाडी शिवारात जेसीबीच्या साह्याने सिमेंटची पाईपलाईन फोडल्याचे उघड झाले. यापूर्वीही या ठिकाणी तीन वेळा पाईपलाईन फोडण्याचे प्रकार घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. काही शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी लावून वाहते पाणी विहिरी आणि शेततळ्यांमध्ये वळविल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

Wombori Pipeline Water Theft
Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटणार; शेतकऱ्यांची चार हजारांच्या पहिल्या उचलीची मागणी

पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता तुषार बबन गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी करडवाडी शिवारात वांबोरी पाईप चारीची पाहणी करताना पाईपलाईन फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे आढळले. पप्पू बुधवंत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ही तोडफोड केल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे वांबोरी चारीचे आवर्तन विस्कळित झाले असून पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wombori Pipeline Water Theft
Bogus Students School Scam: बोगस विद्यार्थी दाखवणाऱ्या गुहा शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन

पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करडवाडी शिवारात जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन तोडफोड झालेल्या अवस्थेत आढळली. तसेच वाहून जाणाऱ्या पाण्यात मोटार टाकल्या, पाईपलाईनच्या नुकसानीमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच पाणीपुरवठा खंडित होऊन संपूर्ण आवर्तन विस्कळित झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मढी हे राज्यासह देशभरातून भाविक येणारे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मार्च महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होतात. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावाला पाण्याची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत पाईपलाईन फोडून पाणी वळविण्याचे प्रकार घडत असल्याने मढी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Wombori Pipeline Water Theft
Ahilyanagar Illegal Water Connections: अहिल्यानगरमध्ये अनधिकृत नळजोडण्यांसाठी अभय योजना; अन्यथा फौजदारी कारवाई

पाईपलाईन फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावर शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची व पाणीपट्टीची रक्कम वसुलीसाठी आर्थिक बोजा नोंदवावा, घटनास्थळावरील जेसीबी, पाईप, विद्युत मोटारी व केबल जप्त कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वारंवार पाणीचोरी होत असल्याचा आरोप करत करडवाडी गावाचा वांबोरी पाणी योजनेतील समावेश कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. वांबोरी चारीचे ४५ दिवसांचे आवर्तन असून पाईपलाईन फोडल्यामुळे मढी गावाला अपेक्षित पाणी मिळालेले नाही. त्यामुळे तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून पूर्ण दाबाने पुढील दहा दिवस वाढीव पाणी द्यावे, तसेच मढी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, अशी मागणी मढी ग्रामस्थ आणि वांबोरी चारी कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, माजी सरपंच भगवान मरकड यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.