Vitthalrao Langhe
विठ्ठलराव लंघे यांची प्रचारखर्चात आघाडी Pudhari

Ahilyanagar: विठ्ठलराव लंघे यांची प्रचारखर्चात आघाडी

151 उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी; 23 डिसेंबरपर्यंत अंतिम खर्च सादर करण्याची मुभा
Published on

Ahilyanagar News: जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार विठ्ठल लंघे यांनी निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी सर्वाधिक 23 लाख 32 हजार 755 रुपये खर्च केला आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा 22 लाख 49 हजार 746 रुपये इतका खर्च झाला आहे. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी 16 लाख 10 हजार 502 रुपये खर्च केल्याची नोंद आहे. निवडणूक प्रचाराचा अंतिम खर्च 23 डिसेंबरपर्यंत सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे.

विधानसभेच्या 12 मतदारसंघांत एकूण 151 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास आयोगाने मुभा दिली होती. यामध्ये स्टार प्रचारकांची सभा, उमेदवारांची तसेच इतर नेत्यांची सभा, रॅली, रॅलीसाठी आवश्यक वाहने, भोजन, नाश्ता तसेच उमेदवारांचे ठिकठिकाणी लागलेलेे फलक आदींचा दररोजचा खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक होते.

या दैनंदिन खर्चाची तपासणी निवडणूक विभागाच्या खर्च पथकाने निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानापूर्वी तीन वेळा केली आहे. मात्र, निवडणुकीतील प्रचाराचा अंतिम खर्च निकाल लागलेल्या दिवसापासून 30 दिवसांत सादर करणे 151 उमेदवारांना बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील 151 उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी 18 नोव्हेंबर रोजी झाली आहे. काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांनी खर्च पथकाने दर्शविलेल्या खर्चापेक्षा अधिक दर्शविलेला आहे. त्यांच्या खर्चात कोणतीही तफावत आढळली नाही. याशिवाय पारनेर तालुक्यातील सर्वच उमेदवारांनी दाखविलेला खर्च आणि खर्च पथकाने काढलेला खर्च तंतोतंत जुळला आहे. उर्वरित राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली आहे. मात्र, या उमेदवारांनी निवडणूक विभागाच्या खर्च पथकाने दर्शविलेला खर्च मान्य केला आहे.

नेवासा मतदारसंघाचे नवनिर्वाचित उमेदवार लंघे यांचा 17 नोव्हेंबरपर्यंतचा खर्च 23 लाख 32 हजार 755 रुपये इतका आहे. या मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) चे उमेदवार शंकरराव गडाख यांचा खर्च 16 लाख 90 हजार 543 रुपये इतका झालेला आहे.

सर्वाधिक कमी खर्च पारनेर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विजयराव औटी यांचा 7 लाख 24 हजार 72 इतका झाला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी 7 लाख 28 हजार 740 5पये खर्च सादर केला आहे.

शिर्डीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा प्रचारासाठी 14 लाख 36 हजार 92 रुपये इतका खर्च झाल्याचा निवडणूक खर्च पथकाने नोंद केली. यामध्ये 1 लाख 92 हजार 661 रुपये खर्चाचा समावेश आहे. मात्र घोगरे यांनी 1 लाख 2 हजार 57 रुपये अधिकचा खर्च दाखविला होता. निवडणूक पथकाने मात्र त्यांचा खर्च 14 लाख 36 हजार 92 रुपये इतकाच असल्याची नोंद केली.

जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार अमित भांगरे यांचा खर्च 16 लाख 43 हजार 112 रुपये, प्रतापराव ढाकणे यांचा 19 लाख 66 हजार, चंद्रशेखर घुले यांचा 12 लाख 38 हजार, प्राजक्त तनपुरे यांचा 15 लाख 96 हजार, राणी लंके यांचा 10 लाख 62 हजार, संदेश कार्ले यांचा 10 लाख 22 हजार, अभिषेक कळमकर यांचा 14 लाख 73 हजार, अनुराधा नागवडे यांचा 14 लाख 47 हजार, राहुल जगताप यांचा 12 लाख 82 हजार तर राम शिंदे यांचा 12 लाख 2 हजार रुपये निवडणुकीसाठी खर्च झालेला आहे.

नवनिर्वाचित आमदारांचा प्रचार खर्च

डॉ. किरण लहामटे 17,08,593

अमोल खताळ 14,36,905

राधाकृष्ण विखे पाटील 16,10,502

कोपरगाव : आशुतोष काळे 20, 88,010

श्रीरामपूर : हेमंत ओगले 19,54,981

नेवासा :विठ्ठलराव लंघे 23,32,755

शेवगाव : मोनिका राजळे 15,72,430

राहुरी : शिवाजीराव कर्डिले 17,15,492

पारनेर : काशिनाथ दाते 14,26,043

अहमदनगर शहर : संग्राम जगताप 20,48,906

श्रीगोंदा : विक्रमसिंह पाचपुते - 11, 74, 452

कर्जत- जामखेड : रोहित पवार - 14,08,412.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news