Shevgaon violence: अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीनंतर शेवगावात हाणामारी; दोन्ही गटांच्या 36 जणांविरोधात गुन्हा

परस्पर विरोधी फिर्यादी
Shevgaon violence
अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीनंतर शेवगावात हाणामारी; दोन्ही गटांच्या 36 जणांविरोधात गुन्हा Crime File Photo
Published on
Updated on

बोधेगाव: शनिवारी रात्री शेवगाव येथील अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीनंतर भास्करवाडी येथे किरकोळ कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली. पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाच्या 36 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

संध्या लक्ष्मण शेलार (रा.भारस्करवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. घरासमोर उभे असताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने असलेली मिरवणूक संपून आलेल्यांनी शिवीगाळ केली. डोक्यात लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Latest Ahilyanagar News)

Shevgaon violence
Jamkhed News: सौताडा येथील रामेश्वर धबधबा येथे पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू

दुसरी फिर्याद संदीप शामराव मिसाळ यांनी दिली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक संपून घरी जात असताना ‘तुमचा डीजे वाजला नाही, असे आरोपी म्हणाले. ‘मी माझे पद्धतीने जयंती साजरी केली, असे म्हणाल्याच्या रागातून शिवीगाळ संदीप मिसाळ व नीलेश बाबासाहेब ससाने यास गजाने मारहाण करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Shevgaon violence
Vikhe Vs Thorat: ‘भोजापूर’वरून विखे-थोरातांचा सामना

...यांच्या विरोधात गुन्हा

संदीप शामराव मिसाळ, सोमा वैरागर, आशुतोष मिसाळ, दीपक कंठाळे, बाळू मगर, अमोल शिरसाट, आकाश काते, अक्षय घाडगे, भोर्‍या शिरसाठ, चंद्रकांत शिरसाट (पूर्ण नाव नाही), करण माऊली मिसाळ, सनी पांडुरंग तिजोरे (सर्व रा इंदिरानगर.शेवगाव), निलेश सोनवणे, निलेश ससाने, करण पाचरणे (रा.सिद्धार्थनगर,अहिल्यानगर) अनोळखी 10 ते 15. सचिन काते, सनी काते (रा सामनगाव,शेवगाव), ईश्वर विश्वास मोहिते, प्रदीप मोहिते, भोला वैरागर, पवन वैरागर (सर्व रा भारस्करवाडी,शेवगाव), बाबू सरोदे, गौरव सरोदे (रा इंदिरानगर,शेवगाव), विठू बाबू सरोदे, बाळू भोला सरोदे, जॉन मोहिते, गणेश संजय भारस्कर, बबलू अशोक भारस्कर, विश्वास मोहिते, बिट्टू संतोष शिंदे, संतोष दिगंबर शिंदे, व्हिस्की मिसाळ, लक्ष्मण शेलार, प्रदीप ससाणे, राहुल सुरेश भारस्कर, राजेश प्रकाश भारस्कर (सर्व रा. भारस्करवाडी,शेवगाव), अनोळखी 10 ते 15 इसम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news