Black Film Action: काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांची धरपकड; शहर वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर

५६ आलिशान वाहनांवर कारवाई, १५२ जणांवर गुन्हे दाखल
Black Film Action
Black Film ActionPudhari
Published on
Updated on

नगर: पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी गुरूवारी शहरात काळ्या काचा लावणारे वाहने व फटाकडा सायलन्ससर लावणाऱ्या वाहनांवर धडाकेबाज कारवाई केली. पोलिसांनी डीएसपी चौकासह विविध काळ्या काचा लावणाऱ्या ५६ वाहनांवर कारवाई केली. सुमारे १५२ जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

Black Film Action
Pathardi Onion Price: पाथर्डी बाजार समितीत कांदा ३५०० रुपये; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शहरातील डीएसपी चौकात लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीदरम्यान, केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये बेकायदेशीरपणे काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) लावून फिरणाऱ्या ५६ फोर व्हीलर वाहनांचा समावेश आहे केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत १५२ कारवाया करण्यात आल्या.

Black Film Action
Ahilyanagar Rainfall: सात तालुक्‍यांत तुटीचा पाऊस; धरणांच्‍या लाभक्षेत्रात नसलेल्‍या गावांतील पिके धोक्‍यात

५६ चारचाकी वाहनांच्या काळ्या फिल्म जागीच काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने केली.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.

- महेश पाटील, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news