

श्रीरामपूर: गावातील एका घटनेत आदिवासी समाजातील दोन तरुणांना गाडी चोरीच्या संशयावरून गावकर्यांनी अडवून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 30 मे रोजी रात्री 9.30 च्या सुमारास राहाता तालुक्यातील चितळी येथील रोहीदास भागवत माळी व त्यांचे मावसभाऊ अशोक साळुंखे हे गोंडेगाव येथे जात असताना काही तरुणांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर गाडी चोरीचा आरोप करत 6 जणांनी एकत्र येऊन मारहाण केली.(Latest Ahilyanagar News)
मारहाणीत त्यांच्या खिशातील प्रत्येकी 25 हजार रुपयेही बळजबरीने काढून घेतले गेले. शिवाय जातिवाचक शिवीगाळ करत धमकी दिली.या प्रकरणी रोहीदास भागवत माळी (रा. चितळी) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बबलु वाघ, पप्पु वाघ, कार्तिक तनपुरे, संकेत सुसरे, मयुर वाघ आणि किशोर वाघ (रा. चितळी) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलिस करत आहे.