Tisgaon Gram Panchayat Arrears: तिसगाव ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; 80 गाळेधारकांना नोटिस, 37 लाखांची थकबाकी

ग्रामपंचायतीच्या आर्थिक हवालदिलामुळे गाळेभाडे व सबस्टेशन शुल्क वसुलीसाठी कडक कारवाई
Tisgaon Gram Panchayat Arrears
तिसगाव ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; 80 गाळेधारकांना नोटिस, 37 लाखांची थकबाकीPudhari
Published on
Updated on

करंजी : पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून तिसगावची ओळख आहे; मात्र येथील ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या कंगाल झाल्याचे दिसत आहे. याचे कारणही तसेच असून ग्रामपंचायत मालकीचे 80 गाळे भाडेतत्त्वावर व्यावसायिकांना देण्यात आलेले आहेत. मात्र व्यावसायिक गाळ्यांचे भाडे वेळेवर व नियमित भरत नसल्यामुळे ग्रामपंचायतने आता थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून गाळ्याचे भाडे न भरल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे. (Latest Ahilyanagar News)

Tisgaon Gram Panchayat Arrears
Mula Sugar Factory Production: मुळा साखर कारखान्यात उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी कामगारांना आवाहन

तिसगाव ग्रामपंचायत मालकीचे जवळपास 80 गाळे असून गेल्या तीन-चार वर्षांपासून गाळेधारक गाळेभाडेच ग्रामपंचायतीकडे जमा करत नसल्यामुळे या गाळेधारकांकडे सुमारे 37 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. ग्रामपंचायतीकडून या गाळेधारकांना अतिशय अल्पदरात गाळे भाड्याने देण्यात आलेले आहेत. अनेक गाळेधरकांनी इतर व्यक्तींना गाळा भाड्याने देऊन त्या त्रयस्थाकडून तीन-चार पट अधिकचे भाडे वसूल केले जात आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतचे गाळे भाडे भरण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे.

Tisgaon Gram Panchayat Arrears
Flood damage bunds breached Ahilyanagar: अतिवृष्टीचा मोठा फटका! नगर जिल्ह्यात 283 बंधारे फुटले

घरपट्टी पाणीपट्टीदेखील भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्न खुंटले असून ग्रामस्थांना मूलभूत सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे तिसगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी थकबाकी असलेल्या सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून आठ दिवसात थकीत गाळेभाडे जमा करा अन्यथा गाळ्याला सील ठोकून तो गाळा इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून तिसगाव ग्रामपंचायतची ओळख आहे मात्र या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच खालावलेली असून ग्रामस्थांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतची आर्थिक सुधारणे देखील महत्त्वाची असून यासाठी ग्रामपंचायत प्रशासन क्शन मोडवर आले आहे.

Tisgaon Gram Panchayat Arrears
Chaitanya foundation bridge restoration walunj: वाळुंज गावाचा तुटलेला रस्ता पुन्हा जोडला; ‘चैतन्य’ने दिली आशा

तिसगाव सबस्टेशनकडे 98 लाखांची थकबाकी

तिसगाव येथे सबस्टेशन झाल्यापासून या महावितरण विभागाने ग्रामपंचायतच्या कराची रक्कम एकदाही न भरल्यामुळे या सबस्टेशनची कराची थकबाकी 98 लाख रुपये झाली आहे. महावितरणने ती आता भरावी. न भरल्यास त्यांनादेखील कारवाईचा सामना करावा लागेल, असे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news