

अहिल्यानगर: महसूलमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताच प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उठवतात हेच कळत नाही. माझ्या माहितीनुसार सध्या तरी सरकारसमोर अहिल्यानगरसह राज्यातील कोणत्याच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही, असे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा विभाजनच्या चर्चेची हवाच काढून घेतली.
मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारच्या सुधारित वाळू धोरणातील बदलावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात वाळू धोरण अधिक प्रभावी कसे करता येईल, त्यात त्रुटी राहणार नाहीत, यासाठी नवीन मंत्री प्रयत्नशील आहेत. विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.