शेवगाव: शेवगाव-तिसगाव रस्त्यावरून धावणार्या मारुती ईको वाहनाने अचानक पेट घेतला नशीब बल्लवत्तर असल्याने पाच प्रवासी सुखरूप बाहेर पडले. ही घटना रविवारी दुपारी अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरासमोर घडली.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने मालक रवी गणेश वखरे वैयक्तिक कामास अहिल्यानगरला गेले होते. तेथून दुपारी 3 वाजता शेवगावकडे येत असताना अमरापूर येथे श्री. रेणुका माता मंदिरासमोर या वाहनाने अचानक पेट घेतला. पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहनातील पाच प्रवासी त्वरित गाडीमधून बाहेर उतरले.
पेटलेल्या वाहनास पाहण्यासाठी येणार्या जाणार्या प्रवाशांची गर्दी झाली. मात्र, आग विझविण्यास आसपास कुठेही पाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन आगीत जळून खाक झाले. हे वाहन घोटण येथील असल्याचे मालक रवी गणेश वखरे यांनी सांगितले.