वकील दाम्पत्य हत्याकांड खटला : निळ्या रंगाची कार आली होतीचहावाल्याने सांगितला घटनाक्रम

चहा विक्रेत्याची साक्ष नोंदविण्यात आली
crime news
वकील दाम्पत्य खून प्रकरणPudhari
Published on
Updated on

राहुरी न्यायालयाच्या आवारात 25 जानेवारी 2024 रोजी निळ्या रंगाची कार आली होती. अ‍ॅड. मनीषा आढाव यांनी दोन पाणी बॉटल विकत घेतल्या. एक आढाव वकिलांना दिली. दुपारी त्या पैसे देण्यासाठी आल्या अन् आरोपी शुभम महाडिक याच्या दुचाकीवर बसून गेल्या, असा घटनाक्रम बुधवारी (ता.8) साक्षीदार चहावाल्याने न्यायालयात कथन केला.

मानोरी (ता. राहुरी) येथील अ‍ॅड. राजाराम आढाव व अ‍ॅड. मनीषा आढाव दाम्पत्याच्या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू आहे. माफीचा साक्षीदार, न्यायालयातील वकील यांची साक्ष झाल्यानंतर बुधवारी न्यायालयाच्या आवारात असलेल्या चहा विक्रेत्याची साक्ष नोंदविण्यात आली. राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणी त्याने सांगितले की, 25 जानेवारी 2024 रोजी अ‍ॅड. आढाव दाम्पत्याला शेवटी एकत्र पाहिले होते. ते दोघेही माझ्या चहाच्या टपरीवर आले होते. अ‍ॅड. मनिषा आढाव यांनी माझ्याकडून दोन पाणी बॉटल विकत घेतल्या होत्या. मात्र, पैसे न देताच त्या कोर्टासमोर उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या कारकडे गेल्या. अ‍ॅड. आढाव कारमध्ये बसलेल्या लोकांशी बोलल्या. कारमध्ये ड्राव्हर सीटच्या शेजारी अ‍ॅड. राजाराम आढाव बसले होते. कार निघून गेल्यानंतर मॅडम कोर्टात गेल्या.

दरम्यान, एक वाजता अ‍ॅड. मनीषा आढाव पाणी बॉटलचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे आल्या. घाईत असल्याने पाणी बॉटलचे पैसे राहिले. शुभम महाडिकच्या मित्राचे जामीनप्रकरण पाथर्डी येथे असल्याने गडबडीत पैसे देण्याचे विसरले, असे म्हणाल्या. त्यांना म्हटले, मॅडम आज खुप गडबडीत आहात. त्या म्हणाल्या, शुभम भैय्या आहे, त्याच्यासोबत वकिलसाहेबांनी बोलावले आहे.

त्यानंतर अ‍ॅड. मनिषा आढाव शुभम महाडिकच्या मोटारसायकलवर बसून निघून गेल्या. त्यानंतर 26 जानेवारी 2024 रोजी अ‍ॅड. आढाव दाम्पत्याचा खून झाल्याचे समजले. साक्षीदाराने तहसीलदारासमोर आरोपी ओळखपरेड झाली तिथे आरोपी शुभम महाडिक याला ओळखल्याचेही न्यायालयात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news